1900 कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूक मतदान प्रशिक्षण

आत्मविश्वासाने काम करा -- अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे

0 96

प्रशासन सज्ज -उपविभागीय अधिकारी संगीता सानप

17-परभणी लोकसभा निवडणुक
95-जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघ

सेलू / नारायण पाटील – 17- परभणी लोकसभा निवडणूक, 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा झालेली असून सदर कार्यक्रमाप्रमाणे दि 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे.

 

जिंतूर विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून या निवडणूकीबाबतचे प्रशिक्षण जिंतूर येथील औंढा रोडवरील गायत्री लॉन्स येथे शुक्रवार ता.29 मार्च 2024 रोजी घेण्यात आले या प्रशिक्षणासाठी 1900 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 

या वेळी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकी बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले .
या प्रसंगी निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी आत्मविश्वासाने काम करावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी केले, तर निवडणूकी साठी प्रशासन सज्ज असून सर्व स्तरावर तयारी सुरू असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता सानप यांनी दिली. निवडणूक उप जिल्हाधिकारी जनार्दन विधाते,तहसीलदार राजेश सरवदे, तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसीलदार कच्छवे मॅडम जिंतूर, नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे नायब तहसीलदार जिंतूर यांची उपस्थिती होती.

 

जिंतूर विधानसभा क्षेत्रातील सकाळ व दुपार सत्रात 1900 मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
श्री राजेश सरवदे यांनी निवडणूक प्रकियेबाबत तर डॉ.संतोष मलसटवाड यांनी EVM बाबत प्रशिक्षण दिले. सर्व मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी EVM मशीनवर प्रात्यक्षिक करून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.

 

 

175 कर्मचारी अनुपस्थित
दि 29 मार्च 2024 रोजी प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यासाठी 95 जिंतूर- सेलू विधानसभा क्षेत्रातील 2026 कर्मचारयांची नियुक्ती करण्यात आली होती, त्या पैकी 175 कर्मचारी या पहिल्या टप्प्यात अनुपस्थित होते. या गैरहजर कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून तात्काळ खुलासा व अहवाल सादर करण्या बाबत आदेशीत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!