पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती

0 803

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.यानंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.

पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभा-यासमोरील तळघर उघडण्यात आलंय.पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी या तळघरात पाहणी केली. या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत.तर विष्णुबालाजी रुपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती सापडली.पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते.त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत.

error: Content is protected !!