दिशाहीन मतदारसंघाला समीर दुधगावकर यांच्या सारख्या अभ्यासु नेतृवाची गरज- तात्यासाहेब सपाटे यांचे प्रतिपादन

0 194

परभणी,दि 15 ःपरभणी लोकसभेला समीर दुधगावकर यांच्यासारख्या सुशिक्षीत नेतृवाची गरज आहे.एक भुमीपुत्र,सर्वसमाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृव अशी ओळख समीर दुधगावकर यांची आहे.त्यामुळे दिशाहीन झालेल्या मतदारसंघाला समीर यांच्या रुपाने एक चांगले नेतृव मिळाले असे प्रतिपादन मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक तात्यासाहेब सपाटे यांनी केले.

परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांच्या प्रचाराचा झंझावात आज सोमवारी जालना जिल्ह्यात पोहचला.
मंठा येथे तळणी फाटा येथे  मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक तात्यासाहेब सपाटे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर हे पायाला भिंगरी लावल्यासारखे संपूर्ण मतदार संघ पिंजुन काढत आहेत.त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.आज सोमवारी दिनांक 15 रोजी जालना जिल्ह्यातील मंठा येथे दौरा केला.यावेळी मराठा आरक्षण योध्दा मनोज जरागे पाटील यांचे खंदे समर्थक तात्यासाहेब सपाटे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री,माजी खासदार अॅड गणेशराव दुधगावकर, उमेदवार समिर भाऊ दुधगावकर, सय्यद हाश्मी , व्यंकटेश काळे, श्री गोरक्षनाथ लाड महाराज,(वंजारी युवक ता.अधयक्ष अंबड ), निळकंठराव वायळ, दत्तराव घारे, श्री वैद्य साहेब, कल्याण खरात, यांची उपस्थिती.
यावेळी बोलताना तात्यासाहेब सपाटे म्हणाले,परभणी लोकसभेला समीर दुधगावकर यांच्यासारख्या सुशिक्षीत नेतृवाची गरज आहे.एक भुमीपुत्र,सर्वसमाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृव अशी ओळख समीर दुधगावकर यांची आहे.त्यामुळे दिशाहीन झालेल्या मतदारसंघाला समीर यांच्या रुपाने एक चांगले नेतृव मिळाले असुन त्यांना आपल्या सहकार्याची गरज असल्याचे तात्यासाहेब म्हणाले,त्यामुळे उच्चविद्याभुषीत व्यक्तीमत्व संसेदत पोहचविण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सपाटे यांनी जाहीर केले.
यावेळी प्रा.व्यंकटेश काळे यांचेही भाषण झाले.यावेळी बापुसाहेब यांनीही मार्गदर्शन केले..यावेळी मंठा तालुक्यातील पाच  सर्कलचे व शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.

error: Content is protected !!