परभणी लोकसभेचा कारभार उच्चशिक्षित भूमिपुत्राच्या हाती देणार,मंठा तालुक्यातील ग्रामस्थांचा निर्धार

0 7

परभणी,दि 16 ः
परभणी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समीर गणेशराव दुधगावकर यांनी मंगळवार दिनांक 16 एप्रील रोजी  मंठा तालुक्यात दौरा केला.या दौऱ्यात त्यांचे ग्रामस्थांनी  उत्स्फूर्तपणे स्वागत केले. परभणी लोकसभेचा कारभार समीर दुधगावकर यांच्या सारख्या  एका उच्चशिक्षित भूमिपुत्राच्या हाती देण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला .

अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर हे सातत्याने प्रचार दौरे करत आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये त्यांनी आज शेवली या सर्कलमध्ये  भेट दिली. तसेच तळणी सर्कल मध्ये हाणवतखेडा, उस्वाद देवठाणा, कानडी, गारठेकी, दहिफळ खंदारे या गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या. यावेळी दुधगावकर यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करत आले. गावातील ग्रामस्थ त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समीर दुधगावकर यांनी सर्वांशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर निस्वार्थी भूमिपुत्राला साथ देण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दुधगावकर यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू असा विश्वास यावेळी तळणी आणि शेवली सर्कलमधील ग्रामस्थांनी व्यक्त केला. सातत्याने दुधगावकर यांना ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा हा राजकीय चित्र पलटविणारा आहे. यासोबत त्यांच्यासह माजी खासदार गणेशराव (बापुसाहेब) दुधागावकर, प्रा.व्यंकटेश काळे आदी उपस्थित होते.
यावेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे  समर्थक नानासाहेब खंदारे,ज्ञानेश्वर देशमुख,प्रकाश सरकटे,माजी सरपंच दिलीप सरकटे,लक्ष्मण खंदारे,संदिप खंदारे,रमएश पवार,सुमीत खंदारे,कृष्णा खंदारे,गणेश खंदारे,कृष्णा सरकटे,माजी सरपचं परमेश्वर मोरे यांच्यासह  सोसायटी चेअरमन,सरपंच,जि.प सदस्य,बापुसाहेब यांचे अनेक जुने निष्ठावंत उपस्थित होते.यावेळी बंजारा समाजातील अनेक पदाधिकाऱ्यांनी बापुसाहेबांच्या कार्याचा दाखला देत समीर दुधगावकर यांना पाठींबा दिला.

error: Content is protected !!