‘गुरखी ‘ गावगाडा नजरेसमोर उभा करणारा कथासंग्रह – डॉ. अशोक पाठक

0 14

सेलू ( नारायण पाटील )
शेत मजूर, स्त्री वेदनांचे वास्तव चित्रण ‘ गुरखी ‘ या राम निकम यांच्या कथासंग्रहात आलेले आहे. ‘गुरखी ‘ कथासंग्रह गावगाडा नजरेसमोर उभा करणारा आहे. असे प्रतिपादन कवी डॉ. अशोक पाठक यांनी केले. ते स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमांतर्गत सोमवार ( दि. १५ ) रोजी कथाकार राम निकम यांच्या ‘ गुरूखी’ कथासंग्रहावर स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष एम.आर. पटेल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गौतम सूर्यवंशी, कथाकार राम निकम यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. अशोक पाठक म्हणाले की, ‘ ‘ गुरखी ‘ कथासंग्रहात परभणी, सेलू परिसरातील मराठवाडी बोली आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कथा ही आपली वाटते. ह्रदयाचा ठाव घेते. ‘ वाळीत ‘ या कथेतील अंध स्त्रिची व्यथा, परावलंबित्व आणि कथासंग्रहातील तरूण विधवा स्त्रिच्या जीवनातील दुःख, ‘ गुरखी’ कथेतील वास्तव चित्रण वाचकांनाही भावनिक करते. हा कथासंग्रह आपण वाचला पाहिजे.’ असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास ललिता गिल्डा, निर्मला लिपणे, प्रा. प्रभाकर रावते, बाबासाहेब चारठाणकर, महेश खारकर, प्रा.डाॅ.गंगाधर गळगे,प्रा.विनायकराव कोठेकर, प्रकाश धामणगावकर,प्रा.प्रभाकर रावते, दत्तात्रय माकोडे, मधुकर वाकडीकर, नागेश देशपांडे, अमोल बिडवे,सुरेखा चारठाणकर, प्रतिभा चव्हाण, प्रमिला कापसे , शुभदा गोळेगावकर, कुंदा मुळावेकर, अनुपमा कुलकर्णी,प्रा.रमेश बैनवाड,संपत पवार, माधव गव्हाणे, विजय ढाकणे,प्रा.डाॅ.राजाराम झोडगे,प्रा.डाॅ . सुरेश उगले,पवन फरकांडे, रघुनाथ देशमुख,प्रा.अनंत मोगल, पुनमचंद खोना,नागेश देशपांडे प्रा.डाॅ.वसंत पांचाळ, गंगाधर गुंजकर प्रा.संजय कोटलवार ,यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन संध्या फुलपगार तर आभार प्रदर्शन सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालयाचे सुरेश हिवाळे., महादेव आगजाळ, पंडित जगाडे, शरद ठाकर, अनिरुद्ध टाके यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!