मराठा समाजाला आरक्षणाच्या चिंतेत सेलू तालुक्यात मजुराची आत्महत्या 

0 28

सेलू,दि 16 ः
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही .या चिंतेत एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील देऊळगाव येथे घडली आहे .

तालुक्यातील देऊळगाव येथील मजुरी काम करणारे बाबासाहेब गीताराम गायकवाड यांनी मुलीस व मराठा समाजास आरक्षण मिळत नाही .या चिंतेतून दि १६/४/२४ मंगळवार रोजी दुपारी दीड चे सुमारास  गावाजवळच्या लेंडी नदीच्या काठावरील पळसाचे झाडास  अंगावरील शर्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे .मुक्तीराम गीताराम गायकवाड यांच्या खबरीवरून सेलू पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जानगर पुढील तपास करीत आहेत .

error: Content is protected !!