पंतप्रधान मोदी यांच्या सभा स्थळाची केली केंद्रीय मंत्र्यांनी पाहणी

0 27
परभणी,दि.16(प्रतिनिधी) : पाथरी रस्त्यावरील लक्ष्मी नगरी परिसरातील मोकळ्या जागेत 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.16) महायुतीचे वरिष्ठ नेते व प्रशासकीय अधिकार्यांनी सभास्थळाची व जिल्हाधिकारी गावडे व पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बाबींची पाहणी केली.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 20 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता परभणीत पाथरी रस्त्यावरील लक्ष्मी नगरी परिसरातील मोकळ्या जागेत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त जोरदार तयारी सुरु असून मंगळवारी महायुतीचे वरिष्ठ नेते व प्रशासकीय अधिकार्यांनी सभास्थळाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, संजय केनेकर, धनंजय कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, आनंद भरोसे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!