सभामंडपाच्या कामाचे भूमीपूजन,शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

0 318

कैलास चव्हाण
परभणी,दि 17 ः

पंतप्रधान नरेंद्र  मोदी हे परभणी लोकसभा निवडणूकीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ 20 एप्रिल रोजी हे परभणीत जाहीर सभा घेणार आहेत.त्यासाठी पाथरी रस्त्यावर लक्ष्मी नगरी येथे बुधवारी दिनांक 17 रोजी सभामंडपाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

परभणी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या विजयासाठी महायुतीचे सर्वच घटकपक्ष जोरदार तयारी करत आहेत.आमदार रत्नाकर गुटे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.पंतप्रधान मोदी यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु झाली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड हे या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे.भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते परभणीत दाखल झाले आहेत.पाथरी रस्त्यावरील लक्ष्मी नगरी हे पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेसाठी स्थळ निश्‍चित करण्यात आले असून तेथील 25 एक्कर जमीन सभास्थान असणार आहे.याठिकाणी भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत आहे.त्याचे भुमीपुजन बुधवारी करण्यात आले.यावेळी यावेळी लोकसभेचे उमेदवार महादेवजी जानकर , आमदार मेघनाताई बोर्डीकर, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश दादा विटेकर, माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शहराध्यक्ष राजेश देशमुख, डॉ.केदार खटिंग, बाबासाहेबजी जामगे यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!