अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांच्यासोबतीला झुंजार छावा संघटनेचे बळ

0 53

परभणी,दि 17 ः
परभणी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांना झुंजार छावा संघटनेने पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी घेतलेली योग्य भूमिका असे सांगत निवडणुकीमध्ये संपूर्ण पाठिंबा असल्याचे  झुंजार छावाने म्हटले आहे.

परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार समीर गणेशराव दुधगावकर (शिंदे) यांना सातत्याने विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. मागील काही दिवसांपासून दुधगावकर हे सातत्याने घनसावंगी, परतुर, मंठा या भागामध्ये दौरे करत आहेत तसेच त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात देखील आपला दौरा केला आहे.
अनेक संघटना या दुधगावकर यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. समीर दुधगावकर यांनी मराठा आरक्षणासाठी मुद्रांक  पेपरवर लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे मराठा समाजातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. झुंजार छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांनी देखील आता दुधगावकर यांना पाठिंबा दिला आहे. आपण मराठ्यांच्या आरक्षणासाठी घेतलेली योग्य भूमिका, चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष या भूमिकेशी न्याय संगत, कोणत्याही नीतिमत्ता सोडलेल्या राजकीय पक्षापेक्षा जिल्ह्यातील भूमिपुत्र म्हणून आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारीला झुंजार छावा संघटना सक्रिय पाठिंबा देत आहे अशा शब्दात दुधगावकर यांना पाठिंबाचे पत्र लिहिले आहे.झुंजार छावाचे संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ कोटकर, केंद्रीय कार्याध्यक्ष निलेश भाऊ डव्हळे यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र आहे.

error: Content is protected !!