मानवत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा

0 258

परभणी,दि.23(प्रतिनिधी) ः कापसाला खाजगी बाजारपेठेत 12 हजार 300 रुपये व सोयाबीनला 8 हजार 700 रुपये असा स्थिर भाव द्यावा, यासह अन्य मागण्यांकरीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मानवत येथील तहसील कार्यालयावर सोमवारी (दि.23) जोरदार एल्गार मोर्चा काढला.
या संघटनेचे नेते रविकांत तुपकर, दामुअण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, गजानन तूरे, केशव आरमळ, विठ्ठल चोखट, दत्तराव परांडे, शिवाजी चोखट, अशोक काळे, श्रीकांत डासाळकर, दत्ता काळे, हनुमान मसलेकर, प्रसाद गरुड, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोंढे, अशोक चोखट, अर्जून पाटील, पाथ्रीकर, रामेश्‍वर आवरगंड, राम चोखट, प्रकाश काळे, दत्ता विष्णू परांडे यांच्यासह अन्य या मोर्चात सहभागी होते.
मोर्चेकर्‍यांनी तालुका महसूल प्रशासनास निवेदन सादर करीत त्या दोन मागण्यांसह पीकविमा वितरीत करावा, राज्य सरकारने जाहीर केलीली अतिवृष्टीची मदत तात्काळ वितरीत करावी, पीकविमा खरीप व रब्बीचा वितरीत करावा, शेतीकर्जासाठी शिबीलची अट तात्काळ रद्द करावी, कृषि कर्ज प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांपर्यंत मदत तात्काळ वितरीत करावी आदी मागण्या या मार्चेकर्‍यांनी केल्या.

error: Content is protected !!