Breaking News : ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाबाबत सर्वात मोठी बातमी

0 667

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) मोठा दिलासा दिला आहे. मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली आहे. समता पार्टीने दोन जजेसच्या बेंचकडे ही रिट याचिका केली होती.

dr. kendrekar

 

शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने (​​Samata Party) केलेला दावा दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. हा समता पार्टीसाठी दुसरा धक्का आहे. यापू्र्वी देखील समता पार्टीच्या वतीने मशाल या चिन्हावर दावा करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती याचिका देखील फेटाळण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टाने समता पार्टीची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला असता तर मुंबईतील पोटनिवडणुकीवर याचा परिणाम होण्याची चर्चा होती. मात्र, न्यायालयाने समता पार्टीची याचिका पुन्हा फेटाळल्याने ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलं. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. ऋतुजा लटकेंविरोधात अपक्ष मिलिंद कांबळेंसह 7 अपक्ष रिंगणात आहेत. दरम्यान निवडणुकीतून माघार घेतलेल्या मुरजी पटेल यांनीही मतदान केलं. यावेळी त्यांनी ऋतुजा लटके यांची तृप्ती सावंत होऊ देऊ नका, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

 

 

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धणुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानं निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धणुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मशाल हे चिन्ह मिळालं. मात्र या चिन्हावर समता पार्टीने देखील दावा केल्यानं ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या होत्या. अखेर समता पार्टीने या प्रकरणात दिल्ली हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. आता दिल्ली हायकोर्टाच्या याचिकेविरोधात समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी दिली आहे.

 

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर…
निवडणूक आयोगाने (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला नवे चिन्हं मिळाले. मात्र, यावर समता पार्टीने आक्षेप घेतला होता. राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे गटाला शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे तर मशाल हे चिन्ह आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं.

error: Content is protected !!