श्री स्वामी समर्थ केंद्रात वृक्षलागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा
सेलू( नारायण पाटील )
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र शिवाजी नगर परभणी येथील केंद्रात.
दि 5 मे बुधवार रोजी जागतीक पर्यावरण दिनानिमित्त कृषीशास्त्र व पर्यावरण प्रकृती विभाग कार्यशाळा संपन्न त सेच वडाचे झाड लावू व जुन, जुलैपर्यंत जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मराठवाडा प्रमुख संदिप देशमुख, आनंद काळे पर्यावरण तालूका प्रमुख सुनील गायकवाड, सचिन माणे, दिपक देशमुख, शंकरराव गात ,अजय पवार आदि उपस्थित होते.
या वेळी विभागाची प्राथमीक माहिती, पेरणी पूर्व तयारी, बीज संस्कार व पेरणी मुहूर्त, शेतीनुसार पिक नियोजन, पिकावरील किड नियोजन यावर कृषीशास्त्र विभाग ची माहिती व मार्गदर्शन आनंद काळे व पांडूरंग हरकळ यांनी तर पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत वृक्षलागवड व संवर्धन अभियान, नदी स्वच्छता व जल संवर्धन, पर्यावरण पूरक जीवनशैली, सण उत्सवातून पर्यावरण जनजागृती, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविने या वर पर्यावरण जिल्हा प्रमुख सचिन माणे तर तालूका प्रमुख सुनील गायचकवाड यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमास गणेशराव नाटकर, मदन चव्हाण, गणेश चव्हाण, दगडोबा चव्हाण, अजय पवार ,अमोल देशमुख, दिपक देशमुख, आदि उपस्थित होते