आचार्य बाळशास्री जांभेकर जयंती अर्थात पत्रकार दिन साजरा

0 113

 

हिंगणघाट, (वर्धा) – महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृतपत्रकार व संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थात पत्रकार दिन श्री गुरूदेव सेवा मंडळ शहर व तालुका समन्वय समिति द्वारा सामुदायिक प्रार्थना मंदिर येथे संपन्न झाला.
पत्रकार दिनाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी झाडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ पत्रकार विजयबाबु राठी, सतीश वखरे, दशरथ ढोकपांडे अनिल कडु, केशव तितरे, वृषीकेश मेश्राम, प्रभाकर शिंदे, व समाज सेवक अनिल भोंगाडे उपस्थित होते.

दिप प्रज्वलित करत व माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली. पत्रकार दिनी ज्यांनी आपली जवळ जवळ ४० वर्षे पत्रकार सेवेस वाहुन घेतली, सर्वाना सांभाळुन घेतले आपल्या विनम्र स्वभावाने पत्रकार व एजंट यांच्या मनात स्थान मिळवले विनम्र स्वभाव परंतु कणखर नेतृत्व करणारे जेष्ठ पत्रकार विजयबाबु राठी यांचा गुरूदेव सेवक व उपस्थित पत्रकार बंधु यांच्या समन्वयाने शाल -श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.

शहरसेवाधिकारी दिनेश हिवंज प्रास्ताविक करतांना म्हणाले की बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पन वृत्तपत्र सुरू करून पहिला अंक प्रकाशित केला हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

या प्रसंगी जेष्ठ पत्रकार सतिशजी वखरे म्हणाले की बाळशास्त्री जांभेकर हे फार थोडे वर्ष जगले परंतु त्यांनी थोड्या काळात उतुंग अशी कामगिरी केली बाळशास्त्रीना मराठी, संस्कृत,बंगाली,गुजराती,कानडी,तेलगु,फारसी,फ्रेंच,लँटीन,ग्रिक अश्या अनेक भाषांचे ज्ञान होते. गुरूदेव सेवा मंडळानी घेतलेला हा कार्यक्रम अभिनंदनास पात्र आहे मी त्यांचे अभिनंदन करतो.

या प्रसंगी पत्रकार केशव तितरे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की वृत्तपत्र चालविणे सोपे वाटत असले तरी ती तारेवरची कसरत आहे.
“पाण्यातला मासा झोपी जातो कसा, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे” असेच काहीसे आहे आणि १८३२ हा काळ इंग्रज शासनाचा काळ अश्या खडतळ काळातही जांभेकरांनी वृत्तपत्र प्रकाशित केले हे एक दैदिप्यमान धाडसच म्हणावे लागेल.
पत्रकार दिना प्रसंगी सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष रमेश झाडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला तो दिवस म्हणजे ६ जानेवारी १८३२ आणि हाच दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणुन साजरा केला जातो, जांभेकरांचा जन्म सिंधूदुर्ग जिल्हातील पोंभूर्ले या गावी झाला ते कुशाग्र बुद्धीचे होते त्यांचे प्रारंभी शिक्षण घरिच झाले त्यांना अनेक भाषा येत होत्या मुद्रीत स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली बाळशास्त्रीनी दर्पन ची भाषा मराठी जरी ठेवली तरी भारतीयांचा आवाज ब्रिटीश शासना पर्यत पोहचवण्या करिता दर्पन वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत असायचा.
या प्रसंगी अनिल भोंगाडे, पत्रकार अनिल कडु व उपस्थित पत्रकार बंधुनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सांगता सामुदायिक प्रार्थनेने झाली.

कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ गुरूदेव सेवक मारोतराव वादाफळे,नंदुभाऊ वानखेडे,नितीन कोरडे, निर्मल इसाळ,दिपक वांढरे, राजुभाऊ उमप ,अक्षय हिवंज, उत्कर्ष हिंगमिरे राजकुमार बोबडे,रामकृष्ण सुर ,मंजिरी हिंगमिरे, सुंदराबाई ठाकुर यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!