संवादाने तणावरहित जीवन जगता येते-अशोक देशमुख

निफाडला शारदीय व्याख्यानमालेला प्रारंभ

0 44

रामभाऊ आवारे
निफाड,दि 26 ः
प्रत्येक माणसाने जीवन जगतांना मन मोकळं केलं पाहिजे घराघरात कुटूंबातील सदस्यांचा संवाद वाढला पाहिजे. संवादाने तणावरहित जीवन जगता येते. मुलांना स्वतःच्या सामर्थ्यावर यश मिळवायला शिकवा.
आज बऱ्याच कुटूंबात मुलांना सर्व काही न मागता मिळते. त्यामुळे ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर होतात असे प्रतिपादन अशोक देशमुख यांनी केले
निफाड येथील रविराज मंगल कार्यालय येथे नवरात्रौत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
हसत खेळत तणावमुक्ती या विषयावर गुंफताना त्यांनी वरील प्रतिपादन केले
शारदीय व्याख्यानमाला कार्यकारी समितीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या शारदीय व्याख्यानमालांचे हे 10 वे वर्ष होय
या व्याख्यानमालेचे उद्घाटन मविप्रचे अॅड
सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी केले याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर , शारदीय व्याख्यानमाला कार्यकारी समितीचे अध्यक्ष रतन पाटील वडघुले , या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे प्रायोजक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि. दा .व्यवहारे , वैनतेय विद्यालयाचे शिक्षक गुलाब टकले व सौ मंदाकिनी टकले आदी मान्यवर उपस्थित होते
आपल्या व्याख्यानात देशमुख पूढे म्हणाले चालण्याचा व्यायाम करणे त्यामुळे तणावमुक्ती साधता येते योगासने व इतर साध्या साध्या शारीरिक क्रियेमुळे तणाव दूर करता येतो.तसेच विविध आजारापासून मुक्ती मिळवता येते. जीवनात हसत राहणे सुखी समाधानी जीवनासाठी आनंद वाटणे , धन्यवाद मानणे विनोदी जीवनशैली ठेवणे यासारख्या कृतीमुळे माणसाला आत्मिक समाधान लाभते असे ते म्हणाले
या व्याख्यानमालेचे प्रास्तविक शारदीय व्याख्यानमाला कार्यकारी समितीचे मार्गदर्शक
वि. दा.व्यवहारे यांनी केले या प्रसंगी अॅड
नितीन ठाकरे , बाळासाहेब क्षीरसागर यांची भाषणे झाली या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन श्रीमती भारती लंबाते यांनी केले व आभार प्रदर्शन रतन पाटील वडघुले यांनी केले

error: Content is protected !!