बायको आणि बहिण सोबत नसते तर… हल्ला करणाऱ्यांना संतोष बांगर यांची थेट धमकीच

0 330

पुणे :शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर रविवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आपली पत्नी व बहिणीसोबत देवदर्शन घेतलं. देवदर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर काही तरुणांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी ‘आला रे आला, गद्दार आला’, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळी संबंधित हल्लेखोरांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हाताने मारण्याचाही प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर आमदार संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. बांगर अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल होताच अंजनगाव सुर्जीमध्ये संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. यावर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बायको आणि बहिण सोबत नसते तर हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले असते असं म्हणत संतोष बांगर यांनी हल्ले खोरांना थेट धमकीच दिली आहे.

याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात. समोरुन येवून सामना करतात त्याला हल्ला म्हणतात. हे ठरवून केलेले कृत्य आहे असं बांगर म्हणाले.
माझी बहीण आणि माझी पत्नी जर माझ्यासोबत नसत्या तर त्यांना संतोष बांगर काय आहे हे त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं असतं अशी धमकी बांगर यांनी दिली आहे.

ज्या पद्धतीने हा हल्ला झालाय याला मर्दानगी म्हणता येणार नाही. माझी बहीण आणि माझी पत्नी जर त्या कारमध्ये नसते एक घाव दोन तुकडे केले असते. असं जर मी केले नसते तर मी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक म्हणून घेण्याच्या लायकीचा नसतो असे चॅलेंजही बांगर यांनी दिले.

error: Content is protected !!