अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य..आगे आगे देखिए, होता है क्या

0 422

गेल्या काही काळापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. आज चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.त्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात काँग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट होत आहे. त्यातून देशभरातून काँग्रेसमधील लोकनेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितच काही मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता एवढंच म्हणेन आगे आगे देखीये होता है क्या…”

दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले असल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावर सध्या एक पत्र व्हायरल झाले आहे. हे पत्र अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना पाठवले असल्याचे सांगितले. या पत्रामध्ये अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला आहे. ज्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे दिसून येते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या!

महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. ‘आगे आगे देखिए होता है क्या’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

error: Content is protected !!