डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश

0 47

हिंगणघाट दि११ प्रतिनिधी
हिंगणघाट येथील दिनांक 4 सप्टेंबर ते 6सप्टेंबर 2022 ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनीमध्ये कु.साक्षी घनश्याम भगत,वर्ग 11वी(विज्ञान)हिने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला व तिच्या प्रतिकृतीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी करिता निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्था सचिव अनिल जवादे, प्राचार्य एच. पी.गुडदे, उपप्राचार्य सूर्यकांत मावळे, उपमुख्याध्याक डॉ. चंद्रकांत नगराळे, पर्यवेक्षक डी. बी.वाघ,आर. एल.शिरपूरकर, सुनीता खैरकार, यांच्या हस्ते साक्षी भगत हिला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सर्व शिक्षक,शिक्षिका, व सर्वविद्यार्थी उपस्थित होते. या यशाकरिता प्रा.विजय नानोटकर,प्रा.ठवरी मॅडम, पी.डी. भगत, तसेच सर्व विज्ञान व गणित शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!