अनंत पैलूंचे योद्धे म्हणून डॉ बाबाबाहेब आंबडेकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची सर्वत्र ओळख-इंद्रजित भालेराव

0 47

 

सेलू / नारायण पाटील – डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही महामानवांची ओळख अनंत पैलूंचे योद्धे म्हणून ओळख आहे .असे विचार व्यक्त करून त्या दोन्ही महामानवांच्या कार्याची व विविध पैलूंची ओळख प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी सेलू येथील कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले . यावेळी त्यांनी स्वरचित महात्मा फुले यांच्या वरील ” ज्योतिबांचे सार रे –” तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील ” भीम बोला ,भीम बोला “ही गीते सादर केली . तसेच त्यांनी यावेळी “काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ,माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ” व ” शिक बाबा शिक ,लढायला शिक ” तसेच ” दो जीवाची माय मही ” या तीन कविता देखील सादर केल्या.

 

 

महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे औचित्य साधून कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था ,सेलू यांच्या विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सेलूचे नावं उज्वल करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा यथोचित सन्मान ” सन्मान कर्तृत्वाचा ” या कार्यक्रमाचे आयोजन येथील साई नाट्यगृहात करण्यात आले होते.

 

 

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिंतूर सेलू विधानसभेचे माजी आमदार विजयराव भांबळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव , माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर ,नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी ,प्रसिद्ध उद्योजक रामप्रसाद घोडके ,व्हिजन इंग्लिश स्कुल चे संचालक संतोष कुलकर्णी ,शंकरलिंग देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव वाडकर ,प्रसिद्ध उद्योजक गोपाल काबरा,प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ वरून नागोरी ,प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहानी ,दत्तराव पावडे ,मधुकरराव पौळ , मंगल कथले ,निर्मला लिपणे , प्रल्हाद कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती .

 

मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपती शिवाजी महाराज व कै अण्णासाहेब काकडे यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .
अशोक उफाडे यांनी प्रास्ताविकात कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या या “सन्मान कर्तृत्वाचा ” कार्यक्रमामागील पार्श्वभूमी स्पष्ट करून आजच्या सन्मान व्यक्तींच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली .
सेलू शहर म्हणजे गुणवंतांची खाण व त्यातील प्रत्येक क्षेत्रातील एक एक मोती जमा करण्याचे व त्यांचा यथोचित सन्मान करण्याचे काम कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था करीत आहे .असे यावेळी संतोष कुलकर्णी यांनी मनोगतात स्पष्ट केले .

 

कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जी प सभापती अशोकराव काकडे यांनी स्पष्ट केले की ,केवळ मिरवणूक काढून महामानवाच्या जयंती साजरी न करता त्यांचा विचारांची जोपासना करून ते तळागाळात नेण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे . उत्कृष्ठ चेअरमन म्हणून पुरस्कार प्राप्त करणारे साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर यांचे त्यांनी कौतुक केले .
यावेळी माजी प्रा डॉ शरद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की ,सेलू शहर हे रत्नांची खाण असून यामधील रत्न पारखून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न अशोकराव काकडे हे कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने करीत आहेत .हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहे .
यावेळी हेमंतराव आडळकर यांनी सत्काराला उत्तर दिले .

 

राजकारण विरहित ,व निवडणुकी उद्देश समोर न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत अशोकराव काकडे हे “सन्मान करत्वाचा ” कार्यक्रम अविरत पणे गेल्या तीन वर्षांपासून घेतात तसेच भूमीपूत्रांचा वेळोवेळी अशोकराव सन्मान करतात . हे कौतुकास्पद आहे .असे विचार माजी आमदार विजयराव भांबळे यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले .कम्युनिस्ट चळवळ जनमानसात वाढणे अत्यंत गरजेचे असल्याचे देखील विजयराव भांबळे यांनी स्पष्ट केले .

 

दिल्ली येथे ” बेस्ट चेअरमन ” पुरस्काराने सन्मानीय करण्यात आल्याबद्दल साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला .
तसेच डॉ विजेंद्र नागोरी (वैद्यकीय )
सर्जेराव लहाने ( सहकार )
नथुरामजी अंभोरे (सामाजिक)
वसंतराव डासाळकर ( शिक्षण )
डी डी सोंनेकर ( क्रीडा )
प्रा संजय पिंपळगावकर (अध्यात्मिक )
शफीक अली खान (सामाजिक )
सोमेश्वर गिराम ( कृषी )
रमेश माने ( रोपवाटिका )
मोहन बोराडे ( पत्रकारिता )
पूजा तोडकर ( संगीत )
ऍड सुनीता ढोले ( विधी )
सुप्रिया सोंनेकर ( नाट्य )
राजेश ब्रम्हाजी धापसे ( सामाजिक )
कलीम भाई बेलदार ( कामगार )
नारायण आबादेव काकडे ( व्यवसाय)
या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मोहन बोराडे यांनी केले तर ह भ प राधाकिशन महाराज हिस्सीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

error: Content is protected !!