मनोज जरांगे पाटील यांनी केली नव्या आंदोलनाची घोषणा

0 212

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मराठा आरक्षणाचा विषय मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मांडला. तसेच त्यांनी एका नव्या आंदोलनाची घोषणा केली. लोकसभेत नाही परंतु विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही जोरात करणार आहोत. तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला नाही तर 4 जूनलाच मी आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

विधानसभेची तयारी जोरात करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने देशातील नागरिकांना न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही आहे लोकचळवळीचा मार्ग मला माहीत आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही. लोकसभेत आम्ही उतरलो नाही, परंतु विधानसभेची तयारी जोरात करणार आहोत. मराठा कोणाच्या सभांना देखील जात नाही. ते फक्त मजा बघत आहेत. ते उमेदवारांना पाडणार आहेत. तो देखील आमचा मोठा विजय होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांना 6 जाती धर्माची लोकं एकत्र आणता आली असती. पण आम्हाला वेळ कमी होता. लोकसभा निवडणूक खूप मोठी असते. त्याचे कार्यक्षेत्र मोठे असते.

 

6 जूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा…

मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या बाजूने मी आहे. आता 6 जूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलन सुरु आहे. आपण 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला महायुतीने काय दिले नाही, पण महाविकास आघाडीवाले तरी कुठे शहाणे आहेत. त्यांनी तर होते ते आरक्षण घालवले. मराठा आरक्षण गोरगरीबांचा लढा आहे. तो आता यशस्वी होणार आहे.

त्याचबरोबर “मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे,” अशी टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

मराठा समाजानं एक लक्षात घ्यावं
“मराठा समाजानं एक लक्षात घ्यावं, पाडण्यातही मोठा विजय आहे. पाडा यांना. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावं. यांना इतक्या ताकदीनं पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे. मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे. आता मराठा समाज यांचा राईट कार्यक्रम करेल. पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. महायुतीनं आम्हाला फसवलं आहे. सरकारला आमच्या छातीत लागलेल्या गोळ्या दिसत नाहीयेत. समाजाला बरोबर कळलंय कुणाच्या विरोधात मतदान करायचंय. मराठे कुणाच्याही सभांना जात नाहीयेत. निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होईल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

error: Content is protected !!