समीर दुधगावकर यांनी केले महामानवांना अभिवादन

0 48

परभणी, दि 14 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी आज रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी येथील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

 

परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये समीर दुधगावकर यांच्यामुळे तिरंगी लढत सुरू झाली आहे.दुधगावकर हे दररोज मतदारांच्या भेटीसाठी घेत आहेत. त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. रविवारी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. याचवेळी सकाळी समीर दुधगावकर यांनी डॉ.आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री,माजी खासदार ऍडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांच्यासह समीर दुधगावकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!