डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त श्री शिवाजी विधी महाविद्यालयात ग्रंथोत्सव साजरा

0 8

परभणी,दि 15 ः
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त म. शि. प्र. मंडळ संचलित श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी येथे दि. १३ एप्रिल २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत ग्रंथसंपदा तसेच वैचारिक साहित्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून ग्रंथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सदरील ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य श्री चंद्रशेखरराव नखाते, श्री गोविंदराव कदम, श्री मकदुम जी मोहिउद्दीन, श्री संतोषराव बोबडे, ॲड दिपकराव देशमुख, ॲड अशोकराव शिंदे, श्री संतोषराव इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. या ग्रंथोत्सवात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन ग्रंथपाल डॉ. सचिन कदम यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ विजय माकणीकर व प्रा. डॉ काशिनाथ नेहरकर यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!