डॉ. प्रियंका खर्चे यांना ३६ व्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात गोल्ड मेडल देवून सन्मानित

0 52

मुंबई प्रतिनिधी, खेमचंद पाटील – मलकापूर तालुक्यातील पिंप्रीगवळी येथील माहेर आणि नाशिक येथे वास्तवास असलेल्या प्रा. डॉ. प्रियंका खर्चे थांडे यांनी पीएचडीमध्ये विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकविल्याने त्यांचा ३६ व्या पदवी प्रदान समारंभात गोल्ड मेडल देवून सन्मान करण्यात आला. मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील डॉ . प्रियंका प्रमोद खर्चे यांनी पीएचडीमध्ये विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकविला. त्या अनुषंगाने ६ जानेवारी रोजी ३६ व्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात त्यांना गोल्ड मेडल देवून सन्मानित करण्यात आले .

 

त्या के. के. वाघ कृषि महाविद्यालय नाशिक येथे असिस्टंट प्रोफेसर ऑफ ऍग्रोनॉमि म्हणून कार्यरत आहे.

 

यांना समाजातील शेतकऱ्यांबद्दल असलेली तळमळ खूप काही सांगून जाते त्या बोलतांना नेहमी म्हणतात शेतकऱ्यांसाठी व समाजासाठी माझ्या ज्ञानाचा उपयोग करून माझा शेतकरी समाज बांधव समृध्द करायचा आहे” असं त्या नेहमी म्हणतात.

error: Content is protected !!