कोकण मराठी साहित्य परिषद तर्फे खेमचंद पाटील यांच्या लेवा साहित्यिक रत्ने ह्या पुस्तकास साहित्यगंध पुरस्कार 2022 प्रदान

0 24

मुंबई प्रतिनिधी – जळगांव जिल्ह्यातील ह. मु. बदलापूर येथे स्थायिक असलेले लेखक खेमचंद पाटील यांना साहित्यिक परिवर्तनात साहित्यिक लेखन तसेच सामाजिक लेखन केले आहे. त्या निमित्ताने डोंबिवली येथे कोकण मराठी साहित्य परिषद , ठाणे जिल्हा आयोजित मराठी सृष्टीचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती अर्थात पत्रकार दिनाच्या निमित्ताने लेखक खेमचंद पाटील यांनी लिखाण केलेल्या लेवा साहित्यिक रत्ने ह्या पुस्तकाच्या निमित्ताने उत्कृष्ठ साहित्य निर्मितीबद्दल साहित्यगंध पुरस्कार २०२२ सन्मानपूर्वक मा. सुकृत खांडेकर संपादक प्रहार तथा विधानसभेतील जेष्ठ पत्रकार यांच्या सह मा. बाळ कांदळकर, मा. डॉ. सुनिल खर्डीकर (शिक्षण महर्षी) हस्ते प्रदान करण्यात आला.

 

त्या वेळेस यजमान शाखा : कोकण मराठी साहित्य परिषद , कल्याण कोमसाप ठाणे जिल्हा ससुनिल बडगुजर, डॉ . योगेश जोशी अध्यक्ष कोमसाप कल्याण शाखा, हेमंत नेहेते कार्यवाहक कोमनाप कल्याण शाखा उपस्थित देण्यात आला.
या पुरस्काराबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. खेमचंद पाटील यांचे कार्य समाजातील युवकांना प्रेरणादायी आहे. त्यांचे कर्तृत्व व प्रतिभाशाली व्यक्तिमत्व लेवा पाटीदार समाजातून पुढे आलेले आहे . त्यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाच्या व कठोर परिश्रमाच्या साहाय्याने लेखन या क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे .

 

त्याच्या घराण्याच्या नावलौकिकाला व परंपरेला शोभेलं असाच त्यांचा जीवन प्रवास सुरू असल्याने त्यांना अल्पावधीत लोकप्रिय झालेले खेमचंद पाटील त्याचे त्यांच्या मित्र परिवारा त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!