वानर मुक्त परभणी अभियान प्रकल्पासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांना मदतीचं साकडं..!

0 40

परभणी दि.27ः
वानर मुक्त परभणी अभियानाने मागील काही महिन्यांपासून जोर धरला आहे. परभणी जिल्ह्यातील वानरांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी व्हावा म्हणून सदर मोहीम शिंदे समीर गणेशराव (दुधगांवकर) यांच्या नेतृत्वात सुरू आहे. परभणी आणि हिंगोलीतील विविध तालुक्यांमध्ये वानरांमुळे दहशती सोबतच शेतीचे मोठे नुकसान होते ही परिस्थिती गेली अनेक दशके होती. कित्येक वर्षांपासूनचा हा जनतेचा त्रास संपावा म्हणून शासन दरबारी या समस्येचा पाठपुरावा केला जात आहे. आजतागायत वस्सा, आसेगांव, राव्हा, एरंडेश्वर, दारेफळ अश्या 8 गावांतुन जवळपास 600 वानरे अभयारण्यात सोडण्यात आली आहेत. 30,000 लोकांना दिलासा मिळाला आहे.

या संदर्भात प्रकल्प प्रमुख एडवोकेट. कपिल निकम यांची माजी मंत्री  बबनराव लोणीकर यांच्या मार्फत वनमंत्री  सुधीरभाऊ मुनगंटीवार प्रत्यक्ष भेट घेवून यांना साकडे घालण्यात आले आहे. सरकारी पातळीवर अधिकारी कर्मचाऱ्यांनी या जनतेला रोजचा त्रास असलेल्या समस्येकडे कटाक्षाने लक्ष घालावे, निधी उपलब्ध करुन द्यावा म्हणून मंत्री महोदयांना साकडे घातले.या कामी प्रकल्प प्रमुख एडवोकेट. कपिल निकम सह टिम समीर भाऊ दुधगांवकर जोरदार पाठपुरावा करत आहे.

error: Content is protected !!