जेथलिया हॉस्पिटल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0 29

परभणी,दि 02 ः
महिला जनजागृती सप्ताहाचे निमीत्ताने अभय दंत असोसिएशन, ब्रिजमोहनची शोभारामजी शर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जेथलिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 05/10/23 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्थळ जेथलिया हॉस्पिटल शिवाजी नगर परभणी येथे  मोफत दंत व कान नाक घसा तपासणी व महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर विषयी योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे .

परभणीतील व जवळपास गावातील सर्व महिलांनी या शिबिराचा व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे नम्र आव्हान जेथलिया हॉस्पिटल चे डॉ प्रशांत जेथलिया, डॉ श्याम जेथलिया डॉ शिल्पा जेथलिया डॉ मीनल जेथलिया अभय दंत असोसिएशन व ब्रिजमोहनजी शोभारामजी शर्मा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद ब्रिजमोहनजी शर्मा व सचिव पवन ब्रिजमोहनजी शर्मा यांनी केले आहे.

error: Content is protected !!