मुलींनी स्वसंरक्षणासाठी सक्षम होणे गरजेचे- पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी

0 56

नारायण पाटील
सेलू,दि 26 ः
आज सर्व क्षेत्रात मुली,महिला आघाडीवर काम करत असतांनाही समाजात मुलींना अनेक प्रश्न भेडसावत असतात.परंतु शालेय व महाविद्यालयीन मुलींनी कुठलीही भीती न बाळगता स्वतःचे संरक्षण करायलाही धाडसाने शिकले पाहिजे असे मत पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी केले.
येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आज दि 26 नोव्हेम्बर रोजी संविधान दिनानिमित्त किशोरवयीन मुलींना मागरदर्शन करण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी,पोलीस कर्मचारी अस्मिता मोरे,जेष्ठ शिक्षिका अलका धर्माधिकारी,जयश्री सोन्नेकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भाग्यश्री पुरी म्हणाल्या की, किशोरवयीन मुलींनी स्पर्शाचे ज्ञान देखील आत्मसात करायला पाहिजे.तसेच समाजात वावरतांना काही त्रास होत असेल तर पोलीस प्रशासन तर आहेच परंतु घरी आईजवळ देखील बोलले पाहिजे.एखादी छोटी बाब देखील गंभीर प्रकारात परिवर्तित होऊ शकते त्यामुळे मुलींनी सतत सतर्क असायला हवे.
तसेच न घाबरता धाडसाने समाजात वावरले पाहिजे.जर अडचणी असतील तर आई,शिक्षिका यांनाही सांगितले पाहिजे.तसेच आपले स्वसंरक्षण करण्यास देखील शिकले पाहिजे.काही अडचण आल्यास मुलींनी पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्याचे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले.
पोलीस कर्मचारी अस्मिता मोरे,अलका धर्माधिकारी यांनीही मुलींना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री शिंदे तर आभार जयश्री सोन्नेकर यांनी मानले.

error: Content is protected !!