सेलुच्या पत्रकारांनी दिली शिराळा येथे भेट, प्रशासनाच्या विरोधात उपोषणास बसण्याचा निर्णय

0 117

नारायण पाटील
सेलू,दि 26 ः
अचानकपणे रात्री बैलाच्या जीभ तुटण्याच्या प्रकारामुळे बहुचर्चित आलेल्या तालुक्यातील शिराळा येथे भेट देऊन पत्रकारांच्या टीम ने घटनेबाबत ग्रामस्थांच्या समस्या व मते जाणून घेतली .या वेळी सदरील घटनेमुळे ग्रामस्थांत प्रचंड भीती असून प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली .व याबाबत लवकर तपास न लागल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .
गेल्या कित्येक दिवसापासून हा प्रकार घडत आहे .याबाबत पशुसंवर्धन विभागाने हा प्रकार कसल्याही रोगाचा नसल्याचा निर्वाळा दिला आहे .व आता हे प्रकरण तपास कामी पोलिसात गेले आहे .

error: Content is protected !!