कै.डॉ.अशोकराव जोगदंड यांना सेलुत अभिवादन

0 114

सेलू दि.28 डिसेंबर
राजर्षी छत्रपती शाहू शि. प्र. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै . डॉ. अशोकराव जोगदंड यांना स्मृतीदिनानिमीत्त जिजामाता बाल विद्या मंदिर आंबेडकर नगर सेलू येथे अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे व्यासपीठावर अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष डॉ. अनिकेत जोगदंड, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग विषयतज्ञ सौ.सुनिता काळे, संस्था सचिव डी.व्हि. मुळे, बाबासाहेब चारठाणकर, डॉ.गोविंद डख, मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉ.अशोकराव जोगदंड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी केले.
माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या नंतर परिक्षक असलेल्या सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. स्मृतिदिना निमित्त घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी शहरातील नूतन विद्यालय, नूतन कन्या, न्यू हायस्कूल, यशवंत, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, विवेकानंद, जिजामाता या शाळेतील स्पर्धकानी सहभाग घेतला, या स्पर्धेत ल. ला. रा. नूतन कन्या प्रश्नाले ची कु. शेवाळे साक्षी डिगंबर हिने प्रथम पुरस्कार, न्यू हायस्कूल शाळेतील कु अश्विनी संजय रणखांब हिने द्वितीय पुरस्कार तर श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय शाळेतील कु.श्रद्धा कैलास बोराडे हिने तृतीय पुरस्कार मिळवला. अनुक्रमे ₹ 151, 101, 51, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते, मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण पंचायत समिती सेलू येथील विषय तज्ञ सौ सुनिता काळे यांनी केले. या प्रसंगी डी.व्हि.मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय समारोप डॉ.अनिकेत जोगदंड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंगेश शेळके तर आभार भगवान पावडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक शिक्षक हेमलता देशमुख , नागरे शेषराव, तसेच मंगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्रीमती खापरखुंटीकर कृष्णकांत, विष्णू कटारे, सुनील राठोड, बाळू धनवे, सादेखा बाजी, लताबाई अंबुरे यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!