आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत अंध विद्यार्थ्यांने घेतला सहभाग

0 25

पुणे,दि 28 (प्रतिनिधी)ः
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे शहर आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत गणेश निंबाळकर या अंध विद्यार्थ्यांने भाग घेतला आहे. सर्व अंध विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ जिमखाना फी घेते परंतु त्यांच्या साठी स्पर्धाच आयोजित करीत नाही. त्यामुळे त्याने नाईलाजास्तव डोळस विद्यार्थ्यांशी खेळायचे ठरवून स्पर्धेत भाग घेतला आहे. नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध व खेळाच्या समानतेच्या तत्वा विरुद्ध त्याला डोळस विद्यार्थ्यानं बरोबर स्पर्धा खेळावी लागत आहे.

पुणे विद्यापीठाच्या क्रेडिट सिस्टीम नुसार विद्यार्थ्यांना जास्तीचे आठ क्रेडिट पूर्ण करावयाचे असतात. त्यामध्ये क्रीडा, एनसीसी, एनएसएस, कला इत्यादी विषयातून हे क्रेडिट पूर्ण करणे अपेक्षित आहे.
परंतु अंध , अपंग विद्यार्थ्यांचा या मध्ये विचारच केलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जास्तीचे क्रेडिट कसे प्राप्त करावयाचे हा प्रश्न गंभीर आहे.
प्रथम वर्षाच्या अनिवार्य शारीरिक शिक्षण या विषयात या विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देवून सुट घेता येते. सूट देवून त्यांचा विकास थांबवून ठेवण्यापेक्षा त्यांच्यासाठी अभ्यासक्रमात योग्य ते बदल करून अभ्यासक्रम राबविता येवू शकतो.
डॉ. दीपक शेंडकर.

error: Content is protected !!