बापाला आव्हान द्यायचं नसतं…डॉ.अमोल कोल्हे बरसले.. अजित पवारांना दिल आव्हानं

0 60

माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, बिबट्यांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास यावर आवाज उठवला, ही चूक केली का? असा सवाल विचारत डॉ.अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना आव्हान दिलंय. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला पाडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना जर मर्दुमकी दाखवायची असेल तर ती दिल्लीत दाखवावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असं अमोल कोल्हे म्हणाले. सर्वांना आव्हान द्या, पण बापाला आव्हान द्यायचं नसतं असा टोलाही त्यांनी लगावला. जुन्नरमधील जाहीर सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार जुन्नरमध्ये आले होते. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि केद्रातील मोदी सरकार यांच्यावर जोरदार टीका केली.

स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली का? 

अजित पवारांनी केलेल्या टीकेवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडला मी काय चूक केली? शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली? की स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली? तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, बिबट्याच्या त्रासापासून त्यांना मुक्त करा. मात्र पाडापाडी आणि दमदाटी इतकंच सुरू आहे. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही.”

error: Content is protected !!