श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0 10

परभणी,दि 29 ः
शहरातील शिवाजीनगर भागातील श्री स्वामी समर्थ केंद्रात 30 एप्रिल ते 6 मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने नाम, जप, यज्ञ, सप्ताह व सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रात महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. दैनंदिन कार्यक्रमात औदुंबर प्रदक्षिणा सकाळी 6:30 वा. भूपाळी आरती सकाळी 8 वा. सामुदायिक श्री गुरुचरित्र वाचन सकाळी 8:15 ते 10:15 वा. त्याचवेळी यज्ञ मंडपात नित्यस्वाहाकार, नैवेद्य आरती 10:30 वा. दररोजचे याग रोज सकाळी 10:45 ते 12:30 वा, दुपारी 2 ते 6 श्री स्वामी चरित्र वाचन, श्री दुर्गा सप्तशती, श्री रुद्र, श्री मल्हारी सप्तशती वाचन व मार्गदर्शन औदुंबर प्रदक्षिणा, नैवेद्य आरती श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, नित्य ध्यान गीतेचा 15 वा अध्याय गीताई,मनाचे श्लोक पसायदान,तुकारामाचा अभंग, विष्णुसहस्त्रनाम वाचन होणार आहे. प्रश्नोत्तरे कार्यक्रम दर गुरुवार व रविवार सेवा पुरुष सेवेकरी करणार आहेत. भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र सेवा केंद्र शिवाजी नगर येथील सेवेकऱ्यांनी केले आहे.

error: Content is protected !!