रोजगारभिमुख रोजगार मेळावा:-उपाध्यक्ष रणजित शिवतरे.

0 34

नसरापूर,दि 28 (प्रतिनिधी):-
पुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून एक सुव्यवस्थित नियोजन करत ,पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपनी यांच्याशी संपर्क साधत भोर ,वेल्हा, पुरंदर तालुक्यातील बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण करत हा मेळावा रोजगारभिमुख करण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भोर, पुरंदर, वेल्हा तालुक्यातील व पंचक्रोशीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती भोरने आयोजित केलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा कुंभारकर लॉन्स, नसरापूर येथे दि. 28 रोजी संपन्न झाला.शेकडो युवक -युवती रोजगारासाठी आवर्जून उपस्थित होते. अनेकांना रोजगार उपलब्ध झाला.
भोर पंचायत समितीचे सभापती लहू नाना शेलार म्हणाले की, रोजगार व शेतीपूरक उपक्रम व या भागात प्रकल्प कसे उभे राहतील, त्याचा शेतकरी बांधवांना जास्त फायदा होऊन आधुनिक तंत्रज्ञानाबाबत तसेच शेती पूरक उपक्रम व तांदूळ महोत्सव प्रकल्प, पंचायत समिती भोर व पुणे जिल्हा परिषद ,पुणे यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न आगामी काळात असणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी पुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प अधिकारी शालिनी कडू, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे,भोर पंचायत समितीचे लहू नाना शेलार ,वेल्हा पंचायत समितीचे सभापती दिनकर अण्णा सरपाले, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे,अमोल नलावडे, दिनकर धरपाळे,शलाका कोंडे ,सरपंच रोहिणी शेटे, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा विद्या यादव, कार्याध्यक्ष संदीप खुटवड, मा. नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे ,इरफान मुलानी, बाबू झोरे,सरपंच अमोल शिळीमकर, शिवाजी यादव,अलका तळेकर, अनिल शेटे ,पुणे जिल्हा परिषदेचे युवा व्यवसायिक पंकज पाटील ,पीएसएलआरएम मुंबई चे अनिता कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण यंत्रणा पुणे जिल्हा परिषद पुणे भोर पंचायत समिती भोर ,वेल्हा पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी व पुणे जिल्ह्यातील नामांकित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी या रोजगार मेळाव्याचे नियोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  निवेदक विठ्ठल पवार यांनी केले. प्रास्ताविक भोर पंचायत समिती गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी केले, तर आभार वेल्हा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे मानले.

error: Content is protected !!