पाथरी डेपोच्या चालक व वाहकाचा प्रामाणिकपणा

महिला प्रवाशाला बॅग व किंमती सामान केले परत

0 74

सेलू / नारायण पाटील – बसमध्ये बॅग विसरलेल्या महिला प्रवाशाला बॅग व किंमती सामान परत करून पाथरी डेपो चालक व वाहकाने प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे.

 

चिखली वरून बुलढाणा येण्यासाठी एक महिला प्रवाशी अनिता पारधी ह्या पाथरी बस डेपोच्या पाथरी बुलढाणा या बसमध्ये बसल्या होत्या.
या प्रवासात त्या बुलढाणा येथील महावितरणच्या स्टॉपवर उतरून घरी निघून गेल्या.
बुलढाणा बस स्थानकात सर्व प्रवाशी उतरल्यानंतर सीटवर प्रवाशाची एक बॅग राहिल्याचे वाहक सुनील खर्डेकर यांच्या निदर्शनात आले .व त्यांनी ती बॅग कंट्रोल रूम वर दिली .

 

 

त्यानंतर आपण बॅग बसमध्ये विसरल्याचे महिला प्रवाशी अनिता पारधी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बुलढाणा बस डेपोत येऊन पाथरी डेपो चालक व वाहक यांना भेटल्या. यावेळी वाहन सुनील खर्डेकर व चालक अविनाश राठोड यांनी सदर बॅग कंट्रोल पॉईंट मधील अधिकारी यांच्याजवळ आपण दिली असल्याचे सांगितले. तसेच महिला प्रवाशाची चौकशी करून तिला तिचे सामान त्यांनी परत दिले.

 

यावेळी बॅगेचे सामान परत मिळाल्याचे समाधान महिला प्रवाशाच्या चेहऱ्यावर दिसून आले . सदर बॅगमध्ये ४ हजार रूपये नगदी, एटीएम, बँकेचे पास बुक व इतर किंमती सामान होते.
यावेळी त्या महिला प्रवाशाने चालक व वाहक यांचे आभार मानले .

 

माणुसकी व प्रामाणिक पणा अजूनही जिवंत असल्याचे या प्रकारातून दिसून येत आहे . परिवहन मंडळाच्या ” प्रवाशांच्या सेवेसाठी ” या ब्रीडवाक्याची जाणीव या चालक व वाहकांनी दाखवून दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .तसेच या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांच्या चालक व वाहकाचा योग्य तो सन्मान करावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे .

error: Content is protected !!