थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी परभणी जिल्ह्यात सेलू वीज वितरणने पटकावला द्वितीय क्रमांक

अधिक्षक अभियंता मंडळ परभणी श्री रा.बा. माने यांचा हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव

0 22

सेलू / नारायण पाटील- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.मंडळ कार्यालयआणि परभणी महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून सेलू शहर शाखा थकीत वीज देयकाच्या वसुली केल्या बद्दल परभणी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

 

सेलू महावितरण चे कार्यकारी अभियंता थोरात यांच्या टीम चा आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीत सेलू शहर शाखा कार्यालय सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी थकीत वीज देयकाच्या वसुली करिता विशेष प्रयत्न करुन महावितरण कंपनीचा महसुल वाढविण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.तसेच मार्च २०२४ अखेर चे वसुली उद्दिष्ट पूर्ण करून परभणी मंडळांतर्गत द्वितीय क्रमांक मिळविला मिळवल्या बद्दल मंगळवार दि ०२/०४/२०२४ अधिक्षक अभियंता मंडळ कार्यालय, परभणी श्री रा.बा. माने यांचा हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

error: Content is protected !!