मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात संघटनानी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

36 संघटनाचा सहभाग

0 18

परभणी,दि 02 ः
लोकशाही समृद्ध आणि मजबूत करण्यासाठी होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये जास्तीत मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झाले पाहिजे ही प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे.त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून राष्ट्रीय कार्यात सर्व संघटनाच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असे आवहान जिल्ह्याधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 साठी परभणी जिल्ह्यातील मतदान जनजागृती करण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून मंगळवार( दी. 2) एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जवळपास 36 विविध संघटनेची बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जिल्हा क्रीड़ा अधिकारी कविता नावंदे, नोडल अधिकारी प्रा.गणेश शिंदे, उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ,डॉ. राजगोपाल कालानी,निवडणूक अव्वल कारकुन डी. एम.गिनगिने आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की प्रत्येक संघटनेच्या पदाधिकारी यांनी स्वतःच्या कुटुंबासह जवळच्या व्यक्ति,नातेवाईक यांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.मतदान जनजागृतीच्या माध्यमातून मतदारांचा मागील 63 टक्के हुन 75 टक्के पर्यंत मतदानाची टक्केवारी वाढ़ावी यासाठी प्रयत्न करावेत असे आवहान केले. यावेळी जवळपास 36 संघटनांचे प्रतिनिधि, स्वीप सदस्य आदिंची उपस्थिती होती. प्रास्ताविकातुन नोडल अधिकारी प्रा.गणेश शिंदे यांनी स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती संदर्भात माहिती दिली.

 36 संघटनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद-
व्यापारी संघटना, अखिल भारतीय वारकरी संघटना,क्रीड़ा संघटना,वस्तीगृह संघटना, कोचिंग क्लासेस संघटना,आयएमए संघटना, पॅथॉलॉजिस्ट,सायक्लिंग संघटना,योग साधना,पतंजली योग,महिला विकास महामंडळ,माजी सैनिक संघटना,पेंशनर संघटना,कोरियोग्राफर, कल्चरल संघटना, जिल्हा ग्रंथालय,लायन्स क्लब,जिम संघटना, दिव्यांग संघटना,अशा अनेक संघटनानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती करणार असल्याचे आश्वासित केले.

error: Content is protected !!