गावोगावी जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढला पाहिजे- नोडल अधिकारी गणेश शिंदे यांचे आवाहन

0 13

 

परभणी,दि 02 ः मागील वर्षी लोकसभेसाठी झालेल्या मतदानाचा आढावा घेत ज्या ठिकाणी राज्याच्या टक्केवारी पेक्षा कमी मतदान झाले आहे त्या गावोगावी जाऊन जनजागृती झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वीपचे नोडल अधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
विधानसभा निहाय नोडल अधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली या बैठकीसाठी स्वीप चे नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे, अप्पर तहसीलदार रंजीत कोळेकर, यु. व्ही. पौळ, एस. डी. आमले , टी.एस. पोले, शिक्षण विस्तार अधिकारी गणराज यरमळ आदींची उपस्थिती होती
चारही विधानसभेचे स्वीप नोडल अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी मतदान जनजागृती राबवण्यासाठी विविध उपक्रम व त्याबद्दलची सविस्तर माहिती गणेश शिंदे व प्रसन्न भावसार यांनी दिली. यावेळी सर्व विधानसभा स्वीप नोडल अधिकाऱ्यांनी राबवण्याबाबतच्या उपक्रमाबद्दल त्यांना माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मतदार जनजागृती करतांना कोणकोणते उपक्रम राबविले जातील या बद्दल सविस्तर माहिती दिली.यावेळी सर्व तालुक्यात आहे संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्वीप पथकातील प्रा. भगवान काळे, प्रवीण वायकोस, अरविंद शहाणे, हनुमंत हंबीरे, त्र्यंबक वडसकर, रामप्रसाद अवचार, प्रसन्न भावसार, अतुल सामाले, मोहन आल्हाट, विशाल पाटिल, भारत शहाणे, महेश देशमुख, प्रफुल्ल शहाणे, ज्ञानेश्वर पाथरकर, सुनील रणखांबे, प्रसन्न भावसार, महेश शेवाळकर, डॉ. सिद्धार्थ मस्के, मारोती वाघमारे, सूत्र संचालन बबन आव्हाड यांनी केले तर सुधाकर गायकवाड यांनी आभार मानले.

error: Content is protected !!