विवेकानंद बालकमंदिराचे वासंतिक संस्कार शिबीर संपन्न

0 11

सेलू( नारायण पाटील )

बाल वयातच लहान मुलांवर शिक्षणा बरोबरच आरोग्यासाठी योग , हस्तकला,चित्रकला आदि संस्कार कायम रुजतात म्हणून येथील.२७ ते ३० मार्च २४ या कालावधीत सकाळी ८ते११ या वेळेत संस्कार शिबीर संपन्न झाले.

शिबीरात दररोज योगाभ्यास , संस्कारक्षम बोधकथां, बालकांमधील कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी विविध कला कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थी व पालकांचा या शिबिरास स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला .श्री .सुधीरराव चौधरी, श्री.किरण डुघ्रेकर व श्रीमती लीलाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालवाडी ताई सौ.रेणुका बोथे, सौ.वृषाली देशमुख . सौ.मोहिनी लोणीकर , सौ.सिमा आष्टीकर यांनी शिबीरातील बाल-बालिकांना योगाभ्यासासह, माती व कागदांपासून विविध वस्तू तयार करणूयाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.या शिबीराचा समारोप श्री.सुधीरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमती लीलाताई देशपांडे यांच्या उपस्थितीत श्री.गौतम सूर्यवंशी यांच्या संतकथा कथनाने झाला.शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व बालवाडी ताई व सेविका संजिवनी यांनी परिश्रम घेतले.पालक वर्गाने या उपक्रमांचे कौतुक केले.

error: Content is protected !!