सोनपेठमध्ये मुख्याधिकारी अ‍ॅक्शन मोडवर,रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

0 29

सोनपेठ दि.२९(प्रतिनिधी) सोनपेठ नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे ऍक्शन मोडवर आल्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे काढुन रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत .
सोनपेठ नगर परिषेदेने शहरातील बाजारपेठेत भव्य सिमेंट रस्ते बांधले आहेत. दुभाजकासह बांधण्यात आलेले सिमेंटचे भव्य रस्ते शहराच्या सौदर्यात भर टाकत असत . तत्कालीन मुख्याधिकारी सोनल देशमुख यांनी या रस्त्याच्या दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करुन यात शोभा आणली होती.पण काही दिवसांपासून या मुख्य रस्त्यावर अनेक छोट्या व्यवसायिकांनी गाडे मांडुन अतिक्रमणे केली होती त्यामुळे तीस मिटरचा रस्ता फक्त तीन मीटरच वाहतुकीसाठी उपलब्ध होता. या अतिक्रमणामुळे नागरीकांना वाहतुकीसाठी अत्यंत अडचणी होत होत्या .महिला वृद्ध शाळेत जाणारी मुले यांना याचा मोठा त्रास होत होता. दि.२९ रोजी मुख्याधिकारी विठ्ठल केदारे हे ऍक्शन मोड मध्ये आले व त्यांनी नगर परिषदेच्या संपुर्ण टिम सह रस्त्यावर उतरुन मुख्य रस्त्याच्या मधोमध करण्यात आलेले अतिक्रमण काढुन टाकले.रस्त्याच्या मध्ये ठेवण्यात आलेले गाडे उचलुन ट्रॅक्टर मध्ये टाकुन नेण्यात आले.अनेकांनी स्वतः हुन आपले गाडे काढुन टाकले .
या वेळी मुख्याधिकारी विठ्ठल केदारे व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.
मुख्याधिकारी यांनी रस्ता मोकळा करुन दिल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त केला असुन. मुख्याधिकारी यांनी असेच काम करुन जनतेच्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा जनतेतुत व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!