विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली चंद्रपूर जिल्ह्यात पुरग्रस्त भागाची पाहणी

0 34

हिंगणघाट,दि 29 (प्रतिनिधी)ः
विरोधी पक्षनेते अजित पवार ता.२८ व२९ जुलै ला विदर्भ  दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांत त्यांनी नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यास विशेष भेट दिली आहे. वर्धा जिल्ह्यातील भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार वर्ध्याच्या दौऱ्यावर असताना यावेळी पूरग्रस्त अतिवृष्टी भागाची पाटणी केली दरम्यान तालुक्यातील कान्होली गाव पूर्ण पुराच्या पाण्याखाली गेले. यात घरात पाणी शिरले. घरातील साहित्य पुरात वाहून गेले. घरातील गहू भिजून गेली. सिलेंडर वाहून गेलं. यामुळे आम्हाला गॅस सिलेंडर द्या, अशी विनवणी पूरग्रस्त महिलेनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याकडे केली. महिलेने अजित पवार यांना विनवणी केली आमचं घर बघा साहेब…, याचदरम्यान अजित पवार यांनी चक्क वाहनातून उतरून महिलेच्या घराची पाहणी केली. यावेळी महिलेचे घर पूर्णतः पाण्याखाली गेले असल्याने ओल पसरलेली पाहायला मिळाली. जी खरी परिस्थिती आहे ती स्वतः अजित पवार यांनी बघितली. महिलेला तातडीने गॅस सिलेंडर देण्यात यावी अशी सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर रस्तभागाची पाहणी परिस्थिती शेतकऱ्यांना शेतात जाऊन गावात जाऊन सर्व लोकांना मदतीचा हात नुकसान भरपाई देऊ असे सांगितले मित्रपरिवार तर्फे आपण पण निवेदन दिले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वडनेर परिसरात सर्व गावातले शेतकरी यांचे पाण्यामध्ये शेत वाहून गेले सर्व शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्‍टरी मिळावा ज्या ज्या लोकांचे पाण्यामुळे घर पडले त्या लोकांना पण घरकुल यादी मध्ये समाविष्ट करावं आर्थिक मदत एक लाख रुपये द्यावी अशी आपण पण मागणी केली आणि वडनेर गावात सर्विस रोड खूप दिवसापासून दुःखाचे प्रवास सर्व गावातील लोक करत आहे. त्यासाठी पण आपण सर्विस रोडची मागणी केली वडनेर गावात उडान पूल खूप लहान असून लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आपण उडान पूल मोठा करून द्यावं यासाठी पण मागणी केली निवेदन मार्फत उपस्थित आमदार रंजीत कांबळे , सुधीर बाबूजी कोठारी हिंगणघाट उत्पन्न बाजार समिती (सभापती) ,सुनीलभाऊ राऊत रा, अतुल  वांदिले महाराष्ट्र सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस , गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर सामाजिक कार्यकर्ते अमोल  चंदनखेडे प्रशांत भाऊ दरोडे, रोशन भाऊ शेख उपस्थित होते.

error: Content is protected !!