सेलूत नागपंचमीनिमित्त “उंच माझा झोका गं “कार्यक्रमाचे आयोजन

0 119

 

सेलू,दि 29 ःराजस्थानी महिला मंडळ,महिला मंडळ सेलू व शास्त्री नगर महिला मंडळाच्या वतीने नागपंचमीनिमित्त ” नागपंचमी महोत्सव २०२२चे आयोजन करण्यात आले आहे .
येथील हुतात्मा स्मारकामध्ये २ औगस्ट रोजी दुपारी १ ते सायंकाळी ८ यावेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमाची सुरुवात नागदेवता पूजनाने होणार असून महिला व मुलींसाठी ,संगीत खुर्ची ,दोरीवरच्या उड्या, उखाणे ,प्रश्न मंजुषा , फुगड्या इत्यादी पारंपरिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे .दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत नागपंचमी विशेष गायक नरेंद्र राठोड प्रस्तृत ” सप्तसुर ” हा गीत संगीताचा कार्यक्रम होणार आहे .तसेच यावेळी प्रथमच महिलांसाठी राहट पाळण्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे .यामधील प्रत्येक स्पर्धेतील ३ विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते परितोषक वितरित करण्यात येणार आहे.तरी सेलू शहरातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद मिळवावा असे आवाहन संयोजकाच्या तसेच विनीत विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
error: Content is protected !!