जिल्हा ग्रंथालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय

2 47

परभणी,दि 11 ः
येथील शासकीय जिल्हा ग्रंथालय येथे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून येथे सुविधा उपलब्ध करून कामकाज सुरळीत करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

शहरात कल्याण नगर येथे शासकीय ग्रंथालय आहे, भव्य अशी इमारत असून या ठिकाणी पुस्तकांची संख्या देखील मोठी आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अंतर्गत असलेल्या या ग्रंथालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी अभ्यासासाठी येतात, परंतु मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना असुवीधेचा त्रास असल्याच्या तक्रारी येत आहेत. वारंवार ग्रंथालय प्रशासनाकडे सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे, यासंदर्भात विद्यार्थ्यांनी येथील जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन देखील त्यांना निवेदन दिले होते, परंतु त्याची दखल घेतली नाही असा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. जिल्हा ग्रंथालयाची वेळ वाढवून देण्यात यावी. सुट्टीच्या दिवशीही ग्रंथालय सुरू ठेवावे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणि जेवणाच्या जागेची व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करावी, ग्रंथालयात शिस्त लावावी, ग्रंथालयामध्ये टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, ग्रंथालयात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
केंद्रीय विद्यालयामुळे जागा गुंतली
केेंद्रीय विद्यालास जागा उपलब्ध नसल्याने ताप्तुरत्या स्वरुपात शासनाने केंद्रीय विद्यालय जिल्हा ग्रंथालय येथे सुरु केले आहे,त्यामुळे येथे अभ्यासासाठी येणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे.शाळेतील विद्यार्थ्यांचा आवाज,वाहनांची ये-जा,पालकांची बाहेर गर्दी यामुळे सतत गर्दी राहत असल्याने अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
गैरसोय दुर करण्याचा प्रयत्न
जिल्हा शासकीय ग्रंथालयात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सुवीधा दिल्या जातात.त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रयत्न सुरु आहेत.शासनाच्या वेळेप्रमाणे ग्रंथालयाचे कामकाज चालते,त्यात बदल करता येत नाही
-बालाजी कातकडे,जिल्हा ग्रंथालय अधिकारी परभणी

error: Content is protected !!