पूर्णा तालूका सरपंच संघटनेच्या तालूका सचिवपदी उत्तमराव ढोणे पाटील यांची निवड

1 40

पूर्णा,दि 11 (प्रतिनिधी):पूर्णा तालूका सरपंच संघटनेच्या तालूका सचिवपदी पांगरा लासीना ग्रामपंचायचे नवनिर्वाचित सरपंच तथा ग्रामविकासाभिमूख नेतृत्व असलेले व्यक्तीमत्व उत्तमराव शेषराव ढोणे पाटील यांची सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव नाना आवरगंड पाटील यांनी तारीख ११ जानेवारी २०२३ रोजी पूर्णा पंचायत समितीच्या सभागृहात १३ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार सोहळ्यात निवड करण्यात आली.यावेळी,गटविकास अधिकारी सौ सुनिता वानखेडे,बाळासाहेबांची शिवसेनेचे गंगाखेड विधानसभा प्रमुख चंद्रकांत सुर्यवंशी,माजी सभापती अशोकराव बोकारे,पंचायत विस्तार अधिकारी सुरेवाड,आरोग्य विस्तार अधिकारी कांबळे,सोन्ना सरपंच शरद कदम,पिंपळा लोखंडे सरपंच प्रतिनिधी मारोती लोखंडे,उपसरपंच गणपतराव लोखंडे,सोनखेड सरपंच प्रतिनिधी हारी पाटील सुर्यवंशी, गोविंदपूर सरपंच नितीन लोखंडे,उपसरपंच रामजी शिंदे,रुपला उपसरपंच भोसले,सरपंच प्रतिनिधी अरुण गुंडाळे,ध टाकळी उपसरपंच मगदूम शेख यासह तेरा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व त्यांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार आनंद ढोणे,सुरेश मगरे,कैलास बलखंडे,अनिल अहिरे व आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!