बुद्धिजीवी भूमिपुत्रांना समीर दुधगावकर यांची साद,सीए, डॉक्टर्स, उद्योजक आणि वकीलांनी दिला पाठींबा

1 3

परभणी,दि 23 ः
मागील 15 वर्षांपासून परभणीमध्ये विकासाच्या नावावर काहीही करण्यात आले नाही. राजकारण्यांनी फक्त आपले खिसे भरायचे काम केले. दडपशाहीच्या या वातावरणातून परभणीला मुक्त करण्यासाठी आणि मतदारसंघाला समृद्ध करण्यासाठी सुशिक्षित उमेदवाराला एकदा संघी देऊन पहा, असे आवाहन अपक्ष उमेदवार समीर गणेशराव दुधगावकर यांनी केले. परभणी येथे आयएमए हॉल येथे आयोजित संवाद बैठकीमध्ये ते बोलत होते.

अपक्ष उमेदवार समीर गणेशराव दुधगावकर यांच्या प्रचारार्थ  कल्याण नगर येथील आयएमए हॉल येथे सोमवारी दिनांक 22 रोजी  संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी परभणीतील नामवंत सीए, डॉक्टर्स, उद्योजक आणि वकील लोकांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना समीर दुधगावकर म्हणाले,परभणी जिल्हा उद्योगधंद्यांच्या बाबतीत एकदम तळाला गेला आहे, कुठल्याही सुविधा योग्य वेळेवर उपलब्ध होत नाहीत. आपल्या येथील विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी स्थलांतरित होत आहेत. हे सर्व थांबविण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध उपलब्ध करून देणे गरजेचे आहे आणि माझा उद्योग क्षेत्रातील अनुभव जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देईल याचा मला विश्वास आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने त्यांच्या मागण्यांचे निवेदन समीर दुधगावकर यांना देण्यात आले. लवकरच त्या मागण्यांवर काम करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या दुधगावकर यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.परभणी मतदार संघाचा विकास करायाचा असेल तर दुधगावकर यांच्या शिवाय पर्याय नसल्याचे उपस्थितांनी बोलुन दाखवले.

error: Content is protected !!