ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात जिल्हा स्वीप पथकाने केली जनजागृती

0 6

परभणी,दि 22 (प्रतिनिधी) ः
जिल्हा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तालुक्यातील पिंगळी रोडवर असलेल्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात जिल्हा स्वीप पथकांच्यावतीने सोमवार (दी.22)रोजी मतदारदूत यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संकल्प मतदान जनजागृतीचा, वाढवूया टक्का मतदानाचा या माध्यमाची शपथ देण्यात आली.यावेळी संस्थाअध्यक्ष के.पी.कनके,प्राचार्य डी. यू.खंडागळे,प्रा.प्रल्हाद भोसले,प्रा.ताटे,प्रा.पवार,प्रा.लोमटे,प्रा.वडजे,प्रा.श्रीनाथ सूर्यवंशी,स्वीप सदस्य प्रवीण वायकोस, बबन आव्हाड,
त्र्यंबक वडसकर,हनुमंत हंबिर, आदिंची उपस्थिती होती.यावेळी मतदार दुतांमध्ये प्रवीण वायकोस यांनी एकपात्री लघुनाटिकातुन मतदान का करावे,एक मताचे महत्व विनोदी शैलीतून पटवून देत मतदानाची शपथ देऊन मतदान जनजागृती केली.बबन आव्हाड यांनी प्रस्ताविक केले.सूत्रसंचालन प्रा.अण्णासाहेब मोरे तर आभार प्रा.संतोष झोड़पे यांनी मानले. मतदान जनजागृतीसाठि स्वीप जिल्हा नोडल अधिकारी प्रा.गणेश शिंदे, उपशिक्षणाधिकारी गणराज येरमाळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मतदान जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्वीप सदस्य अरविंद शहाणे, प्रा.भगवान काळे, रामप्रसाद अवचार,प्रेमेंद्र भावसार,
डॉ. सिद्धार्थ मस्के,प्रफुल्ल शहाणे,मोहन आल्हाट, ज्ञानेश्वर पाथरकर,भारत शहाणे, अतुल सामाले,
महेश शेवाळकर,प्रसन्न भावसार,विशाल पाटिल,सुनील रणखांबे,मारुती वाघमारे अदि पुढाकार घेत आहेत.

error: Content is protected !!