भगवान महावीर जयंतीनिमित्त सेलूत शोभायात्रा; ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक

उत्साहाचे वातावरण : चिमुकल्यांसह, महिला, तरूण सकल जैन समाज बांधवांचा मोठा सहभाग

0 10

 

 

सेलू / नारायण पाटील – जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६२२वी जयंती रविवारी, २१ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा व भगवान महावीर प्रतिमेच्या पालखी मिरवणुकीत चिमुकल्यांसह, महिला, तरूण आणि सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

सेलू शहरातील जैन मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास शोभायात्रा निघाली. सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांने पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल, ताशांच्या गजराने व‌ भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. महावीर जयंतीनिमित्त गेल्या चार दिवसांपासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीरांचा जलाभिषेकांसह ,स्वाध्याय,ध्वजारोहण,अभिषेकपूजन,विविध धार्मिक विधी उत्सव ,भजन संध्या,विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. उत्सवासाठी सेलू शहरातील सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेतला.

 

भगवान महावीरांनी सांगितलेली तत्त्वे

भगवान महावीरांनी जैन धर्माची पाच तत्त्वे सांगितलेली आहेत. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ही जैन धर्माची पाच मुख्य तत्त्वे आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पाच तत्त्वांचे पालन करून जीवनाचा खरा उद्देश साध्य केला पाहिजे, असा संदेश भगवान महावीरांनी विश्वातील संपूर्ण मानवजातीला दिला.

error: Content is protected !!