सावित्रीबाई फुले जयंती निमित्त केमापूर येथील शाळेत बाल आनंद मेळावा

1 53

सेलू,दि 04 (प्रतिनिधी)ः
नवीन शैक्षणिक धोरणाच्या संकल्पनेतील समूह शाळा ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे ता. ३ मंगळवार रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.राणी नवनाथ गुठ्ठे,अंगणवाडी पर्यवेक्षिका गोकुणवार, प्रणिता गाडे,कल्पना गुठ्ठे,संभाजी सारोक, प्रकाश आंधळे यांची उपस्थिती होती.
बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी इडली,वडा,चणे,भेळ,
गुळकाड्या,बालुशाही,
पेढा,चाॅक्लेट,
पेरु,टरबूज,पपई,बोरं,
पाणीपुरी अशा विविध खाद्यपदार्थसह मेथी,पालक,वांगे,मिरच्या,टोमॅटो व इतर भाजीपाला आणि वह्या, पेन विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.आनंद मेळाव्यात अडसर वस्ती,सिंगठाळा,बोथ तांडा शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थी पालकांनी दिवसभरात नऊ हजार सातशे रुपयांच्या खरेदी विक्रीचा आनंद घेतला.
दुपारी कथाकार भगवान कुलकर्णी यांनी ग्रामीण शैली मध्ये मुलांना नैतिक मूल्य, संस्कारशील कथांचे कथन केले.कुलकर्णी यांनी मुलांना खळखळून हसवत प्रसंगी भावनिक करून डोळ्यांच्या कडा पाणवायलाभाग पाडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शरद ठाकर,दगडूबा माघाडे,राजेभाऊ गिते, शिवाजी पिंपळकर, संतोष बोरकर, दत्ता शिंदे, गोपाल धोंडगे, गोविंद पाचंगे, देविदास राठोड यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर रोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर इघारे यांनी केले.

error: Content is protected !!