आखाडा बाळापूरात शांतता बैठक संपन्न

0 41

आखाडा बाळापूर-प्रतिनिधी
येथील पोलीस स्टेशन मध्ये स.पोलीस निरीक्षकब पी.सी.बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धर्मीय बांधवांची शांतता बैठक आयोजित करण्यात आली .गेल्या काही दिवसापासून नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आखाडा बाळापूर शहर व परिसरामध्ये धार्मिक व सामाजिक वातावरण बिघडत चालले होते.
शांतता प्रिय असलेल्या आ. बाळापूर शहर व परिसरातील वातावरण सलोख्याचे ठेवण्याकरिता पोलीस स्टेशनच्या वतीने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सोशल मीडियावर समर्थन व विरोध करत धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या याप्रकरणी या बाबींमध्ये पुन्हा भविष्यात सामाजिक व धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी समिती गठित करण्यात आली.
याबैठकीत ठाणेदार बोधनापोड य उपसरपंच बाबा उर्फ जिया कुरेशी, माजी उपसरपंच विजय पाटील बोंढारे, सय्यद असद कादरी, ठाकूर सिंग बावरी मोहम्मद गौस,मोहम्मद फुलवाले, दीपक पवार ,बालाजी हेंद्रे ,गोपाल बोढारे, मोहम्मद शफी,मौलाना आश्रफी, सोपान पाटील बोंढारे,महेंद्र सिंग बायस,पत्रकार शेख फारुख गिरगावकर,रमेश कदम,विठ्ठल पंडित,शफी डोंगरगावकर,विष्णू आहेर,राम हेंद्रे,गजानन चव्हाण,प्रकाश कोकडवार, विनायक हेंद्रे, आदींनी आपले मत मांडले.सर्व धर्मीय सामाजिक कार्यकर्ते नेते यांनी शांतता अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला .

error: Content is protected !!