पंतप्रधान मोदीजींना येथे लोकशाहीची मते मागण्याचा अधिकारच उरला नाही-माजी खासदार अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर यांची टिका

1 15

परभणी,दि 18ः
मोदी हे पुरोगामी परभणीला जातीयवादीचे विष पेरण्याासाठी येत आहेत..या अगोदर याच परभणी लोकसभा मतदारसंघातील अंतरवली सराटी येथे दोन कोटी जनता एका ठिकाणी जमते,आरक्षणाची मागणी करतात पण मोदीजी त्यांच्या मागणीचा अ आ आणि म सुध्दा काढत नाहीत.खरं तर संसदीय लोकशाही मध्ये जनतेच्या मागणीला दूर्लक्षीत केले जातेय…म्हणजे लोकशाही नाही..मोदीजींना येथे लोकशाहीची मते मागण्याचा अधिकारच उरला नाही अशा शब्दात माजी मंंत्री,माजी खासदार अॅड गणेशराव  (बापुसाहेब) दुधगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली.

घनसावंगी तालुक्यातील शहागड येथे   मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे मामा वसंतराव (आण्णा ) सपाटे यांच्या हस्ते अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर उदघाटन करण्यात आले.यावेळी बापुसाहेब बोलत होते.यावेळी  उमेदवार समीर दुधगावकर,   तात्यासाहेब सपाटे. बप्पासाहेब खरात,परमेश्वर राखोडे,अभिषेक लहुटे,अमोल भाकड,किशोर शिंदे,विकास मुळे,समीर कुरेशी,अशोक राखोंडे,अप्पासाहेब काठोटे,पुरुषोत्तम जंगले,गहिनीनाथ महाराज,बालासाहेब वझुरकर,शेषेराव मोहीते,अमोल सपाटे, सय्यद बाबर,किशोर शिंदे, भुजग नाटकर उपस्थित  होते.
समीर दुधगावकर यांचे शहागड येथे आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले.ढोलताशाच्या गजरात   मिरवणूक काढण्यात आली.यावेळी समीर दुधगावकर यांनी गावातील व्यापारी बांधवाच्या बेटी घेतल्या.मिरवणुकीत सर्व समाजातील नागरीकांनी सहभाग घेतला.यावेळी  प्रास्ताविक  प्रा. व्यंकटेश काळे पाटील यांनी केले.

 

 

error: Content is protected !!