सर्वच राजकिय पक्षाकडून जाती धर्माचे गलिच्छ  राजकारण सुरु-जेष्ठ नेते माजी मंत्री गणेशराव दुधगावकर यांची टिका

0 47

परभणी,दि 19 ः
परभणी लोकसभा मतदार संघातील सर्वच विधानसभेत विविध जातीधर्मातील लोकांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे.या जिल्ह्यातील मतदारांनी कधीच जातीवाद केला नाही आणि करणारही नाहीत.असे असताना यंदा सर्वच सर्वच राजकिय पक्षाकडून जाती धर्माचे राजकारण केले जात आहे,हे चुकीचे आहे परंतु राजकीय खेळीला जिल्ह्यातील मतदार थारा देणार नाहीत असा विश्वास जेष्ठ नेते माजी मंत्री,माजी खासदार गणेशराव (बापुसाहेब) दुधगावकर व्यक्त केला आहे.

परभणी लोकसभा निवडणुकीत सध्या मतांच्या धुर्वीकरणासाठी प्रमुख राजकीय पक्षाकडून जातीवाद करुन समाजात वाद निर्माण केले जात आहे.यावर गणेशराव (बापुसाहेब) दुधगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बापुसाहेब म्हणाले,परभणी जिल्हा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा असुन परभणी जिल्ह्यात जातीचा कुठेही लवलेश नाही.आता पर्यंत बी.आर देशपांडे,ए.आर खान,सुंदरलाल सावजी,विश्वनाथराव कात्नेश्वरकर, ज्ञानोबा हरी गायकवाड,सुरेश जेथलिया,कुंडलिक नागरे,सिताराम घनदाट,विठ्ठलराव चिंचोलीकर,शामराव नाईक अशा अनेक जातीधर्मातील नेत्यांना प्रतिनिधीत्व देणारा हा  जिल्हा असताना यंदाच्या निवडणुकीत सर्वच राजकिय पक्षाकडून जाती धर्माचे राजकारण केले जात आहे.त्यामुळे समाजात धुर्वीकरण होऊन दुषीत वातावरण निर्माण करण्याचे काम राजकीय पक्षाकडून केले जात असल्याचा आरोप  गणेशराव दुधगावकर यांनी केला आहे.

विद्यमान खासदारांचे एखादे काम सांगा
सध्याचे खासदार संजय जाधव यांनी 10 वर्ष संसदेत जाऊन का केले असा प्रश्व बापुसाहेबांनी केला आहे.संसदेत प्रश्नच मांडले नसल्याने ते सुटणार कसे ? जिल्ह्यात एकही नवीन उद्योग,सिंचन प्रकल्प आणता आला नाही,10 वर्षे आमदार 10  वर्षे खासदार म्हणून काम करत असताना एक तरी मोठ काम सांगा असे आवाहन बापुसाहेबांनी केले आहे.
भाजपाला सुनावले खडेबोल
मतासाठी जातीवाद करुन निवडणुका जिंकता येत नसतात असे सांगताना बापपुसाहेबांनी भाजपावर निशाना साधला आहे,ते म्हणाले,महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे चांगले नेतृव असले तरी त्यांच्या पक्षाचे जिल्ह्यात काहीच नसताना तसेच भाजपा देखील आताकुठे जिल्ह्यात रुजु लागली आहे.त्यामुळे एवढ्या दुरच्या व्यक्तीला केवळ जातीच्या आधारावर उमेदवारी दिली आहे हे अजिबाद पटणारे नाही.मतांसाठी जातीवाद करु नका,हे मोठ्या पक्षाला शोभत नसल्याचे सांगत बापुसाहेबांनी भाजपाला टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परभणीत येत आहेत.चांगली गोष्ट आहे,परंतु तुम्ही जर केवळ जातीवादाचे विष पेरण्यासाठी येत असतील तर मोठ्या पदावरील नेत्याला शोभणारे नसल्याचे सांगत मोदी यांच्यावर देखील बापुसाहेबांनी शेलक्या शब्दात टिका केली.

कॉंग्रेस कुणी संपवण्याचा प्रयत्न केला ?
सर्वच पक्षात फुटाफुटी झाली.50 वर्षा पासून पदे भोगणारे अनेक जण सत्तेतल्या पक्षाकडे वळले आहेत.कॉंग्रेसचे अस्तित्व कमी करुन आता दुसऱ्या पक्षात जात आहेत. अनेकांनी सर्व पदे भोगली आता त्यांच्या कुटूंबातील सदस्य भाजपात गेले.त्यांना विचारायला हवे की, कॉंग्रेस का संपली.कुणी संपवली ?   तसेच अशोकराव चव्हाण यांनाकॉंग्रेसने  काय   कमी केले होते.की त्यांना भाजपात जावे लागले. ? सर्व भोगुन उतारवयात दुसऱ्या पक्षात जायचे हे बरोबर नाही असे सांगत पक्षातंरावर बापुसाहेबांनी जोरदार हल्ला चढवला.

म्हणून समीर दुधगावकर मैदानात
परभणी लोेकसभा निवडणुकीत एकाही पक्षाने स्थानीक प्रतिनिधीला उमेदवारी का दिली नाही,का आमच्या जिल्ह्यात उमेदवार मिळत नव्हते जे दोन्ही कडुन बाहेर जिल्ह्यातील उमेदावर दिले आहेत.असे सांगत परभणी जिल्ह्याच्या अस्मितेसाठी स्थानीक उमेदवार असावा म्हणून भूमीपूत्र म्हणून समीर दुधगावकर यांना मैदानात उतरविले आहे.समीर यांना जनतेचा प्रचंड पाठींबा देखील मिळत आहे.हा जिल्हा कष्टकऱ्यांच्या,चळवळीचा आणि विकास आंदोलानातील लढाउ कार्यकर्त्यांचा,सामान्य जनतेचा,पुरोगामी विचारांचा आहे .त्यामुळे निश्चीत येथील जनता जातीवादाल थारा न देता समीर यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास बापुसाहेबांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!