गंगाधरराव दुडके यांचे निधन

1 10

परभणी,दि 19 ः
परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथील जेष्ठ नागरिक गंगाधरराव सखाहरी दुडके यांचे 19 एप्रिल शुक्रवारी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. नृसिंह मंदिरात मागील काही वर्षांपासून विणेकरी म्हणून सेवा करत होते. पोखर्णी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रभावती विद्यालय परभणी येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा चित्रकार नारायण गंगाधरराव दुडके यांचे हे वडील होत.

error: Content is protected !!